प्राप्तिकर नोटिशीवरून काँग्रेसकडून भाजप लक्ष्य

इंडिया’च्या आजच्या ‘लोकशाही वाचवा’ रॅलीत पडसाद शक्य वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘इंडिया’ आघाडीतर्फे रविवारी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ महारॅली (सेव्ह डेमोव्रेसी रॅली) काढण्यात येणार आहे. ही रॅली होण्यापूर्वीच काँग्रेसने शनिवारी प्राप्तिकर नोटीसबाबत भाजपला कोंडीत पकडले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आमच्या पक्षाला कमकुवत करायचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आता रविवारी होणाऱ्या ‘इंडिया’च्या […]

प्राप्तिकर नोटिशीवरून काँग्रेसकडून भाजप लक्ष्य

इंडिया’च्या आजच्या ‘लोकशाही वाचवा’ रॅलीत पडसाद शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘इंडिया’ आघाडीतर्फे रविवारी दिल्लीत ‘लोकशाही वाचवा’ महारॅली (सेव्ह डेमोव्रेसी रॅली) काढण्यात येणार आहे. ही रॅली होण्यापूर्वीच काँग्रेसने शनिवारी प्राप्तिकर नोटीसबाबत भाजपला कोंडीत पकडले. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आमच्या पक्षाला कमकुवत करायचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आता रविवारी होणाऱ्या ‘इंडिया’च्या मेळाव्यातही हा मुद्दा गाजण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत.
‘इंडिया’ रॅली कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची नाही. ही लोकशाही वाचवा रॅली आहे. ही कोणा एका पक्षाची रॅली नसून जवळपास 27-28 पक्ष यात सहभागी होणार आहेत. ‘इंडिया’ आघाडीचे सर्व घटकपक्ष त्यात सहभागी होतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले. याचवेळी भाजपने विरोधी आघाडीच्या मेळाव्याचा खरपूस समाचार घेताना त्याला ‘भ्रष्टाचार बचाओ आंदोलन’ असे संबोधले आहे. शहजाद पूनावाला यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल म्हणायचे की लालू यादव, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना तुऊंगात टाकू कारण त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. मात्र, आज केजरीवाल तुऊंगात असून न्यायालय त्यांना दिलासा देत नाही असे ते पुढे म्हणाले.
 ‘भाजप वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडर’
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी शनिवारी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी टेबलवर एक वॉशिंग मशीन ठेवलेले दिसले. त्यावर बीजेपी वॉशिंग मशीन लिहिले होते. हे वॉशिंग मशिन दाखवत पवन खेडा यांनी भाजप ज्या नेत्यांवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप करतो, तेच नेते नंतर त्यांना पक्षात सामावून घेतात आणि गुन्हे मागे घेतात. भाजपकडे असे वॉशिंग मशिन आहे की, दहा वर्षे जुनी केस टाकली तरी आरोपी स्वच्छ होतात, असे खेडा म्हणाले. मशीनसोबतच हा चमत्कार मोदी वॉशिंग पावडरनेही केल्यामुळे आरोपी वॉशिंग मशिनमधून पूर्णपणे चमकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने बाहेर पडतो, असेही ते म्हणाले.
‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीला कोण उपस्थित राहणार?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचे अनेक नेते एकत्र येणार आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, सीपीआयचे सरचिटणीस डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, द्रमुकचे तिऊची शिवा, टीएमसीचे डेरेक ओब्रायन आणि इतर नेते या रॅलीला उपस्थित राहू शकतात.