ऑटो ड्रायव्हरच्या भूमिकेत हुमा

‘गुलाबी’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री हुमा कुरैशीने स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विपुल मेहता सांभाळत आहेत.  हुमाच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘गुलाबी’ आहे. या चित्रपटात हुमा ऑटोचालकाची भूमिका साकारत आहे. नव्या प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने हुमाने आनंद व्यक्त केला आहे. दृढ इच्छाशक्ती असलेल्या महिलेची खरीखुरी कहाणी ती प्रेक्षकांसमोर मांडणार […]

ऑटो ड्रायव्हरच्या भूमिकेत हुमा

‘गुलाबी’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री
हुमा कुरैशीने स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विपुल मेहता सांभाळत आहेत.  हुमाच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘गुलाबी’ आहे. या चित्रपटात हुमा ऑटोचालकाची भूमिका साकारत आहे. नव्या प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने हुमाने आनंद व्यक्त केला आहे.
दृढ इच्छाशक्ती असलेल्या महिलेची खरीखुरी कहाणी ती प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. विशाल राणा आणि जियो स्टुडिओकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. हुमाने चित्रपटासाठी एक पोस्ट शेअर केली असून यात ती विशाल राणा आणि विपुल मेहता यांच्यासोबत दिसून येते.
हुमा कुरैशी  ‘महारानी3’ या वेबसीरिजवरून चर्चेत राहिली होती. यातील हुमाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. या सीरिजच्या मागील दोन सीझनमध्ये देखील तिने दमदार अभिनय केला होता. हुमाने आता अभिनयासोबत निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. हुमा याचबरोबर आणखी काही चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.