… आणि छगन भुजबळ दिल्लीत

… आणि छगन भुजबळ दिल्लीत

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बहुतांश वेळा सोबत असतात. मात्र एनडीएच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या दिल्ली दौऱ्यात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पहिल्यांदाच दिल्लीत अजित पवारांसोबत दिसले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या एडीएच्या महत्वाच्या बैठकीलाही छगन भुजबळ उपस्थित होते. महायुतीत राहून महायुतीला प्रतिकूल भूमिका घेणाऱ्या छगन भुजबळांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेतृत्वाने हे पाऊल उचलल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांना विचारात न घेता केवळ काही मोजके लोक पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेतात, अशा टीकेचा सूर अनेकवेळा पक्षातूनच उमटल्याचे पाहायला मिळत होता. यानंतर अजित पवार गटामध्ये हे बदल दिसून आले. राजधानी दिल्लीत आज एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाच्या वतीने अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ देखील उपस्थित होते. सातत्याने होत असलेल्या टीकेनंतर छगन भुजबळ पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या नेत्यांसोबत दिल्लीत दिसले.

Go to Source