युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर रशियाकडून हल्ले सुरूच

कीव : युक्रेनच्या पश्चिम कीव भागातील पायाभूत सुविधांवर रशियन क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. या हल्ल्यामुळे आग लागून एक इमारत उद्ध्वस्त झाल्याचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी सोशल मीडिया अॅप टेलिग्रामवर जाहीर केले आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या या हल्ल्यामुळे रविवारी युव्रेनच्या ओडेसा भागातील हजारो लोकांचा […]

युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर रशियाकडून हल्ले सुरूच

कीव :
युक्रेनच्या पश्चिम कीव भागातील पायाभूत सुविधांवर रशियन क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. या हल्ल्यामुळे आग लागून एक इमारत उद्ध्वस्त झाल्याचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी सोशल मीडिया अॅप टेलिग्रामवर जाहीर केले आहे. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ऊर्जा प्रकल्पावर झालेल्या या हल्ल्यामुळे रविवारी युव्रेनच्या ओडेसा भागातील हजारो लोकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे सुमारे 1 लाख 70 हजार घरांची वीज खंडित झाली होती, असे  युक्रेनच्या डीटीईके या सर्वात मोठ्या खासगी वीज ऑपरेटर कंपनीने सांगितले.