यह तो ट्रेलर है भाई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
हा ज्यावेळी लेख तुम्ही वाचत असाल त्यावेळी भारतात राजकीय पटलावर बाजी कोण मारणार, याचे उत्तर आपल्याला संध्याकाळपर्यंत मिळणार. परंतु अमेरिका आणि विंडीजमधील संयुक्तरीत्या होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोण बाजी मारणार, याचे उत्तर मात्र आपल्याला 29 जूनलाच मिळणार.टी-20 विश्वचषकाचा फड पहिल्याच दिवसापासून रंगू लागला. विश्वचषकाची सुऊवात तर दिमाखदारपणे झाली आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने कॅनडाला हरवत भारत व पाकिस्तानला गंभीर इशारा दिला. तर दुसरीकडे पापुआ न्यू गिनी संघाने विंडीजच्या तोंडाला फेस आणला. एकंदरीत काय तर ही स्पर्धा रंगतदार होणार अशीच काहीशी चिन्हं. मी कालच्या लेखात म्हटलं होतं की नवखे संघ उलटफेर करणार का? तर त्याचे उत्तर आता तरी हो आहे असं म्हणावं लागेल. बघता बघता पहिल्या तीन सामन्याने याची उत्तरं आपल्याला मिळालीत. परंतु या सर्व गोष्टीत मला यजमान विंडीजची कीव करावीशी वाटते. क्रिकेट कुणाला कधी कडेवर घेऊन नाचेल आणि कधी कोणाला डोक्यावर उचलून आपटेल याचा कधी भरोसा नाही. अर्थात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वेस्टइंडीज संघ. झटपट क्रिकेटमधील पहिले दोन विश्वकप विंडीजच्या नावावर. त्यानंतर त्यांचा ग्राफ पूर्णत: खाली आला. विजयासाठी त्यांना अक्षरश: वणवण भटकावं लागलं.
2023 च्या विश्व कप स्पर्धेत तर पात्रता फेरीही गाठू शकला नाही. परंतु त्याच क्रिकेटने पुन्हा विंडीजला टी-20 फॉरमॅटमध्ये दोन विश्व कप देऊन जिवंत ठेवले. विंडीजच्या संघाचा विचार केला की धीप्पाड देहयष्टी असलेले खेळाडू समोर दिसतात. त्यांचा आक्रमकपणा हाच त्यांच्या विजयाचा पाया. याच आक्रमकतेवर त्यांनी आजवर बरेच गड सर केलेत. परंतु मागील काही वर्षात त्यांचा बेभरवसेपणा जास्त दिसून आला. काल तर पहिल्याच सामन्यात असा देश जो भौगोलिकरित्या पूर्वेला आहे की उत्तरेला आहे किंबहुना क्रिकेटमधील अ ब क अद्याप अवगत झाले नाही अशा संघाविऊद्ध पराभवाच्या छायेत होते. नशीब बलवत्तर म्हणून रोस्टन चेस मदतीला धावून आला.
विंडीज संथ खळपट्टीवर गडगडतो हे आपण बऱ्याचदा बघितलं. नेमकं तेच इथे घडलं. विंडीज अजून न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविऊद्ध लढायचे आहेत. परंतु हे जे सामने होणार आहेत ते सामने मात्र या खेळपट्टीवर नाहीत. वेस्टइंडीजचे खेळाडू कधी केव्हा कुठे माती खातील याचा काही नेम नाही. तुम्हाला आठवतच असेल ज्यावेळी भारताने 1983 मध्ये अंतिम फेरीत विंडीजला हरवलं त्यावेळी खऱ्या अर्थाने माल्कम मार्शलने मैदानात माती खाल्ली होती. असो. बघता बघता ही स्पर्धा रंगतदार होतेय, हे. पहिल्या दोन दिवसात बघायला मिळाले. त्यातच काल आपल्याला या स्पर्धेत ट्विस्ट बघायला मिळाला. नामीबिया आणि ओमानचा बरोबरीत निघालेला सामना. ही विश्वकप स्पर्धा किती गुंतागुंतीची असेल हे या सामन्याने दाखवून दिले. या पहिल्या तीन सामन्याने मात्र सट्टेबाजार चकित झाला असेल तर नवल वाटू नये. असो. उद्या भारताची लढत आयर्लडशी आहे. त्याबद्दल आपण उद्याच्या अंकी सविस्तर बोलणारच आहोत. तूर्तास तरी असेच म्हणावे लागते की यह तो ट्रेलर है भाई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
Home महत्वाची बातमी यह तो ट्रेलर है भाई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
यह तो ट्रेलर है भाई, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
हा ज्यावेळी लेख तुम्ही वाचत असाल त्यावेळी भारतात राजकीय पटलावर बाजी कोण मारणार, याचे उत्तर आपल्याला संध्याकाळपर्यंत मिळणार. परंतु अमेरिका आणि विंडीजमधील संयुक्तरीत्या होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत कोण बाजी मारणार, याचे उत्तर मात्र आपल्याला 29 जूनलाच मिळणार.टी-20 विश्वचषकाचा फड पहिल्याच दिवसापासून रंगू लागला. विश्वचषकाची सुऊवात तर दिमाखदारपणे झाली आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने कॅनडाला हरवत भारत […]