जुलैपासून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस?

जुलैपासून धावणार अमृत भारत एक्स्प्रेस?

देशातील विविध राज्यांचा प्रवास : सामान्य प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
भोपाळ-बेंगळूर व्हाया पुणे या मार्गावर अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान आहेत. या एक्स्प्रेसमुळे बेळगावलाही बेंगळूर व भोपाळला जाण्यासाठी एक अतिरिक्त एक्स्प्रेस उपलब्ध होणार आहे. निवडणुकांचा निकाल जाहीर होताच या एक्स्प्रेसची घोषणा होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेचा प्रवास करता यावा, यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत एक्स्प्रेस सुरू केली. या एक्स्प्रेसला वातानुकूलित ऐवजी स्लीपर व जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करणे सोयीचे होईल. मागील अनेक वर्षांपासून भोपाळ-बेंगळूर मार्गावर एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यामुळे नागरिकांची ही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे.
भोपाळ-पुणे-बेंगळूर या मार्गावर अमृत भारत एक्स्प्रेस धावणार असल्याने याचा बेळगाव, हुबळी, मिरज येथील नागरिकांना फायदा होईल. बेळगावमधून पहिल्यांदाच अमृत भारत एक्स्प्रेस धावणार आहे. याचबरोबर म्हैसूर-बेंगळूर-मुंबई, म्हैसूर-अहमदाबाद-द्वारका, मंगळूर-वैष्णोदेवी कत्रा, बेळगाव-तिरुपती-चेन्नई, बेळगाव-होस्पेट-हावडा या मार्गावर अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.