विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
दुकान मालकाविरुद्ध एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
जोरदार पावसामुळे दुकानात शिरलेले पाणी मोटर लावून बाहेर काढताना विजेचा धक्का बसून अमननगर येथील कामगार युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी हरिकाका कंपाऊंड परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात दुकान मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शाबीरअली इमामहुसेन घाटवाले (वय 46) रा. दुसरा क्रॉस, अमननगर असे त्याचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. शुक्रवार दि. 26 जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली असून माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
उपलब्ध माहितीनुसार शाबीरअली हा जुने गांधीनगर येथील हरिकाका कंपाऊंडमधील गौस मोहिद्दीन राजेसाब हत्तरकीहाळ यांच्या रॉयल हार्डवेअर या दुकानात काम करीत होता. जोरदार पावसामुळे शुक्रवारी सायंकाळी दुकानात पाणी साचले होते. मोटर लावून पाणी बाहेर काढताना विजेचा धक्का बसून शाबीरअली अत्यवस्थ झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
यासंबंधी शुक्रवारी रात्री उशिरा गौस मोहिद्दीन हत्तरकीहाळ या दुकान मालकाविरुद्ध दुर्लक्षपणाचा ठपका ठेवत कुटुंबीयांनी फिर्याद दिली आहे. भारतीय न्यायसंहिता कलम 106 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवागार परिसरात कुटुंबीयांचा एकच आक्रोश सुरू होता.
Home महत्वाची बातमी विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू
दुकान मालकाविरुद्ध एफआयआर प्रतिनिधी/ बेळगाव जोरदार पावसामुळे दुकानात शिरलेले पाणी मोटर लावून बाहेर काढताना विजेचा धक्का बसून अमननगर येथील कामगार युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी हरिकाका कंपाऊंड परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात दुकान मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शाबीरअली इमामहुसेन घाटवाले (वय 46) रा. दुसरा क्रॉस, अमननगर असे त्याचे नाव […]