सातव्या वेतन आयोगाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीत निर्णय : निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
वार्ताहर /नंदगड
कर्नाटक राज्य सरकारी नोकर यांच्या प्रलंबित सातव्या वेतन आयोग अंमलबजावणीबाबत खानापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवार दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक सोमवारी खानापूर शहरातील ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी होते. कर्नाटक राज्य नोकर संघाचे राज्याध्यक्ष यांच्या निर्देशानुसार वरील निवेदन देणेकरिता खानापूर तालुक्यातील सर्व निवृत्त कर्नाटक राज्य नोकर यांनी वेळेत उपस्थित राहून, शांततेत व संघटितपणे निवेदन देण्यास उपस्थित राहून सहमती व सहकार्य करावे, असे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी यांनी बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. संघटनेत नव्याने सामील झालेल्यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेच्या पुढील उपक्रमाबाबत बैठकीत काहींनी विचार मांडले. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. नव्याने सभासद झालेल्या आयुर्वेद बंडोपंत पाटील यांनी डेंग्यू आजाराबाबत माहिती सांगून डेंग्यू आजार न होण्यासाठी सर्वांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती सांगितली. प्रास्ताविक व स्वागत सचिव सी. एस. पवार यांनी केले. एल. डी. पाटील यांनी अहवालाचे वाचन केले. एम. जी. बेनकट्टी यांनी सहलीबाबत माहिती दिली. तर उमाकांत वाघधरे यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी सातव्या वेतन आयोगाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
सातव्या वेतन आयोगाबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या बैठकीत निर्णय : निवेदन देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वार्ताहर /नंदगड कर्नाटक राज्य सरकारी नोकर यांच्या प्रलंबित सातव्या वेतन आयोग अंमलबजावणीबाबत खानापूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना बुधवार दि. 10 रोजी सकाळी 10.30 वाजता निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक सोमवारी खानापूर शहरातील ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. बनोशी होते. कर्नाटक राज्य नोकर संघाचे राज्याध्यक्ष यांच्या […]