आम्ही दिल्लीतील खेचरांना कायमचे पाणी पाजू,म्हणत उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल

आम्ही दिल्लीतील खेचरांना कायमचे पाणी पाजू,म्हणत उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका विशेष मुलाखतीत दिल्लीतील दोन खेचरांना कायमच पाणी पाजायचं आहे असं म्हणत  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला केला आहे. 

सध्या लोकसभा निवडुकाची रणधुमाळी सुरु असताना सर्व पक्ष प्रचारसभा घेत एक मेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. 

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार असून पहिल्या तीन टप्प्यात महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या ठिकठिकाणी अनेक सभा झाल्या. सभेतून त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचावर हल्लाबोल केला. त्यांना आता शिवसेने ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी -शाह यांचावर टीका केली. ते म्हणाले , सध्या लोकशाही टिकवण्यासाठी लढा सुरु आहे. सध्या महाराष्ट्रात भगवी लहर आहे. देशासह राज्यात बदल नक्कीच होत आहे. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते आता अनुभवतील. दिल्लीतील दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त ठाकरे-पवारच दिसतात. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू  अशा शब्दात त्यांनी मोदी -शाह वर घणाघात केला. 

 

Edited by – Priya Dixit

 

Go to Source