कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात पाणीकपात
मुंबईतील ए विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो-३ चे काम सुरू असताना बाराशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची शनिवार, 11 मे रोजी दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. मुंबई महापालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून एक हजार 500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा, तर पुढे एक हजार 200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा वापर केला जातो. या जलवाहिनीने होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने, तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो-3 चे काम सुरू असताना, या बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस गळती लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेच्या दुरुस्ती विभागाने घटनास्थळी पाहणी केली.
जलवाहिनीची ही गळती लवकर दुरुस्त करावी लागणार आहे. अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो. दुरुस्तीसाठी सात ते आठ तास पाणीपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. मंत्रालय व मरिन ड्राइव्ह हा परिसर महत्त्वाचा असल्याने महापालिकेने मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती कामाचे प्राधान्य त्यांना कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे.
मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी 11 मे रोजी जलवाहिनीच्या दुरुस्तीची परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागांतर्गत दुरुस्ती विभागाने 11 मे रोजी दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती कामे हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून खोदकाम सुरू केले जाईल. जलवाहिनीतील पाण्याचा उपसा करून, नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी 3.30 वाजल्यापासून केले जाणार आहे. संबंधित भागात सकाळ व दुपारच्या सत्रात पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणीपुरवठ्याच्या वेळांत बदल (दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या दुरुस्ती कालावधीसाठी)या परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंदकुलाबा (नियमित पाणीपुरवठा सायं. 4.30 ते 6.30 वा.), कोळीवाडा (अतिरिक्त पाणीपुरवठा सायं 6.30 ते सायं 6.45), नौदल परिसर (अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा सायं. 6.50 ते सायं 7.05 वा) हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या परिसराला विलंबाने पाणीपुरवठानौदलाला रात्री 10.30 ते पहाटे 2.50 या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होणार आहे.दुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेता कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.हेही वाचामे महिन्यातच आंब्याची आवक घटली
महाराष्ट्रातील महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा
Home महत्वाची बातमी कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात पाणीकपात
कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरात पाणीकपात
मुंबईतील ए विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो-३ चे काम सुरू असताना बाराशे मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची शनिवार, 11 मे रोजी दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.
मुंबई महापालिकेच्या ए विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून एक हजार 500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा, तर पुढे एक हजार 200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा वापर केला जातो. या जलवाहिनीने होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने, तसेच कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो-3 चे काम सुरू असताना, या बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस गळती लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेच्या दुरुस्ती विभागाने घटनास्थळी पाहणी केली.जलवाहिनीची ही गळती लवकर दुरुस्त करावी लागणार आहे. अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.
दुरुस्तीसाठी सात ते आठ तास पाणीपुरवठा खंडित ठेवावा लागणार आहे. मंत्रालय व मरिन ड्राइव्ह हा परिसर महत्त्वाचा असल्याने महापालिकेने मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती कामाचे प्राधान्य त्यांना कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे.मरिन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी 11 मे रोजी जलवाहिनीच्या दुरुस्तीची परवानगी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या जलअभियंता विभागांतर्गत दुरुस्ती विभागाने 11 मे रोजी दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती कामे हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून खोदकाम सुरू केले जाईल.
जलवाहिनीतील पाण्याचा उपसा करून, नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी 3.30 वाजल्यापासून केले जाणार आहे. संबंधित भागात सकाळ व दुपारच्या सत्रात पाणीपुरवठा केला जाणार आहे.पाणीपुरवठ्याच्या वेळांत बदल (दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या दुरुस्ती कालावधीसाठी)
या परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
कुलाबा (नियमित पाणीपुरवठा सायं. 4.30 ते 6.30 वा.), कोळीवाडा (अतिरिक्त पाणीपुरवठा सायं 6.30 ते सायं 6.45), नौदल परिसर (अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा सायं. 6.50 ते सायं 7.05 वा) हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.या परिसराला विलंबाने पाणीपुरवठानौदलाला रात्री 10.30 ते पहाटे 2.50 या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर, म्हणजेच नियमित पाणीपुरवठ्याच्या तुलनेत विलंबाने होणार आहे.
दुरुस्तीची आवश्यकता लक्षात घेता कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.हेही वाचा
मे महिन्यातच आंब्याची आवक घटलीमहाराष्ट्रातील महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा