मोठी बातमी: अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यांना २ जूनरोजी आत्मसमर्पण करण्यास सांगितले आहे. यामुळे ऐन निवडणुकीत केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केजरीवाल २१ मार्चपासून तुरुंगात आहेत
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. तो या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता आणि दारूच्या व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्याचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे. हे आरोप फेटाळून लावणाऱ्या ‘आप’ने दिल्लीत नेतृत्व बदल होणार नसून मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे स्पष्ट केले आहे.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आज (दि. १०) आरोपपत्र दाखल करणार होते. केजरीवाल यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार आणि किंगपिन म्हणून केजरीवाल यांच्या नावाची यादी करणार आहे. त्यामुळे दिल्ली दारू घोटाळ्यात केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून नावाचा समावेश
ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख रणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मनी ट्रेल शोधून काढले आहे. उद्या सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरही सुनावणी होणार आहे.
Supreme Court grants interim bail to Delhi CM Arvind Kejriwal till June 1 and asks him to surrender on June 2 https://t.co/vRxqua9HjW
— ANI (@ANI) May 10, 2024
हेही वाचा
तर अरविंद केजरीवाल मतदानाचा अधिकार बजावण्यापासून वंचित राहणार
‘आप’ला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेची आशा
Arvind Kejriwal arrest news | ब्रेकिंग! अरविंद केजरीवाल यांना 6 दिवसांची ईडी कोठडी