फेब्रुवारी अखेरपासूनच पाण्याचे संकट
पाण्यासाठी शहरवासियांचा संघर्ष : एल अॅण्ड टीसमोर नियोजनाचे आव्हान, एप्रिल-मे महिन्याबाबतही चिंता
बेळगाव : पाऊस कमी प्रमाणात झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीसमस्या तीव्र बनू लागली आहे. शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरवासियांची धडपड सुरू आहे. येत्या उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत आतापासूनच चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे एल अॅण्ड टी कंपनीने राकसकोप आणि हिडकल जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याचा साठा अधिक असल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे शहरात पाणीटंचाई निर्माण होवू लागली आहे. यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून 15 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता 15 टँकर पुरणार का? असा प्रश्नही पडू लागला आहे. शहराबरोबर उपनगरातही पाणीसमस्या गंभीर बनू लागली आहे. सार्वजनिक विहिरी, कूपनलिका आणि इतर जलस्त्राsतांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिंताजनक बनू लागला आहे. फेब्रुवारी अखेरपासूनच शहरवासियांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात शहरवासियांना सुरळीत पाणी मिळणार का? हा चिंतनाचा विषय बनला आहे.
पावसाअभावी यंदा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने 329 गावांसाठी टँकरची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. पाणीसमस्या निवारण्यासाठी 320 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे प्रशासन पाणी समस्या कशी हाताळणार? हेच पहावे लागणार आहे. येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके अधिक बसणार आहेत. विशेषत: पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एल अॅण्ड टीसमोर पाणी नियोजनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. राकसकोप जलाशयाची पाणी पातळी 2466.60 फूट इतकी तर हिडकल जलाशयाची पाणी पातळी 29.582 टीएमसी इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही जलाशयांची पाणी पातळी अधिक आहे. मात्र यंदा विहिरी, कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. परिणामी काही भागात नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे. त्यामुळे येत्या एप्रिल, मे महिन्यात परिस्थिती बिकट बनणार आहे. त्यामुळे आतापासूनच नागरिकांना पाण्याची चिंता लागली आहे.
पाणी गळतीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे
शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होवू लागला आहे. यासाठी एल अॅण्ड टी कंपनीने तातडीने लक्ष घालून विनाकारण वाया जाणारे पाणी थांबवावे. जलवाहिण्यांची तातडीने दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
पाणी जपून वापरा
पाणी समस्या तीव्र बनत चालल्याने नागरिकांनी दैनंदिन पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनही एल अॅण्ड टी ने केले आहे. विनाकारण पाण्याचा अपव्यय टाळावा. दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करावा. नळ, पाईपद्वारे विनाकारण वाया जाणारे पाणी थांबवावे. भविष्यातील पाणीसमस्या लक्षात घेऊन पाण्याचा वापर करावा.
विनाकारण पाण्याचा अपव्यय टाळा
राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीत गतवर्षीची तुलना करता पाणीसाठा अधिक आहे. शिवाय शहरात 15 टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे.
– हार्दिक देसाई, कार्यकारी अधिकारी एल अॅण्ड टी कंपनी
Home महत्वाची बातमी फेब्रुवारी अखेरपासूनच पाण्याचे संकट
फेब्रुवारी अखेरपासूनच पाण्याचे संकट
पाण्यासाठी शहरवासियांचा संघर्ष : एल अॅण्ड टीसमोर नियोजनाचे आव्हान, एप्रिल-मे महिन्याबाबतही चिंता बेळगाव : पाऊस कमी प्रमाणात झाल्याने यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीसमस्या तीव्र बनू लागली आहे. शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरवासियांची धडपड सुरू आहे. येत्या उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत आतापासूनच चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे एल अॅण्ड टी कंपनीने राकसकोप […]