कर्णधार रशीद खानला ताकीद

वृत्तसंस्था /किंग्जटाऊन (सेंट विनसेंट) अफगाण क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खान याला आयसीसीच्या शिस्तपालन समितीकडून सक्त ताकीद देण्यात आली. 24 जून रोजी खेळविण्यात आलेल्या बांगलादेश बरोबरच्या सामन्यात अफगाणने शानदार विजय मिळवून उपांत्यफेरी गाठली होती. या सामन्यात पराभवानंतर निराश झालेल्या बांगलादेश संघातील खेळाडूंना रशीद खानकडून मैदानावरच हिनवण्याची कृती झाली. या संदर्भात आयसीसीच्या शिस्तपालन समितीने रशीद खानच्या या […]

कर्णधार रशीद खानला ताकीद

वृत्तसंस्था /किंग्जटाऊन (सेंट विनसेंट)
अफगाण क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खान याला आयसीसीच्या शिस्तपालन समितीकडून सक्त ताकीद देण्यात आली. 24 जून रोजी खेळविण्यात आलेल्या बांगलादेश बरोबरच्या सामन्यात अफगाणने शानदार विजय मिळवून उपांत्यफेरी गाठली होती. या सामन्यात पराभवानंतर निराश झालेल्या बांगलादेश संघातील खेळाडूंना रशीद खानकडून मैदानावरच हिनवण्याची कृती झाली. या संदर्भात आयसीसीच्या शिस्तपालन समितीने रशीद खानच्या या प्रकरणावर पंचांच्या सामना अहवालाची दखल घेत कोणताही दंड न करताना केवळ ताकीद देवून या प्रकरणावर पडदा टाकला.
रशीद खानकडून गेल्या 24 महिन्यांच्या कालावधीतील हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याच्या वर्तवणुक नोंदीमध्ये एक गुण अधिक करण्यात आला. मात्र अफगाणचे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या पराभवानंतर अफगाण संघातील खेळाडू नाराज झाले.