रहाणे इंग्लिश कौंटी स्पर्धेत दाखल

रहाणे इंग्लिश कौंटी स्पर्धेत दाखल

लंडन : येथे सुरू असलेल्या इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने लिसेस्टर क्लबबरोबर नुकताच नवाव करार केला आहे. सदर माहिती या क्लबच्या व्यवस्थापकाने गुरूवारी दिली. आता इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेतील लिसेस्टरशायरच्या उर्वरित अंतिम पाच सामन्यात अजिंक्य रहाणे खेळणार आहे. तसेच इंग्लिश कौंटी क्रिकेटमधील वनडे चषक प्रकारातही तो सहभागी होणार आहे. लिसेस्टरशायर क्लबने मुल्डेरच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे. प्रथम श्रेणी तसेच लिस्ट ए आणि टी-20 प्रकारात रहाणेने 26 हजारांपेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. त्यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे. भारतीय संघांकडून खेळताना त्याने क्रिकेटच्या विविध प्रकारात 8 हजार धावा जमविल्या असून त्यामध्ये 15 शतकांचा समावेश आहे. 2016 साली झालेल्या न्युझीलंड बरोबरच्या कसोटी सामन्यात रहाणेने 188 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.