रायगडचा विश्वजित ठाकूर ठरला महास्पीड गोलंदाज
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात जसप्रित बुमराह, झहीर खान, ब्रेट ली, शोएब अख्तर, ग्लेन मॅकग्रा, डॅनी मॉरिसन यांच्यासह दिग्गज खेळाडूंनी केलेली वेगवान गोलंदाजी पाहून जगभरातील क्रिकेटप्रेमी प्रभावित झाले आहेत. याच गोलंदाजांनी सामन्यांमध्ये ताशी 140 ते 155 किलो मीटर वेगाने चेंडू खेळपट्टीवर टाकल्याचेही सर्वांनी पाहिले आहे. याच वेगाची आठवण कऊन देत महाराष्ट्रातील नवजवान गोलंदाजांनी ताशी 127 ते 140 किलो मीटर वेगाने खेळपट्टींवर चेंडू टाकत आपल्यातील धमक दाखवली. निमित्त होत ‘महास्पीड स्टार : शोध महावेगाचा’ या मोहिमेचा. याच्या अंतिम फेरीत सिनिअर गटातून प्रतिनिधीत्व केलेला रायगडचा गोलंदाज ठाकूरने ताशी 140 किलो मीटर वेगाने चेंडू खेळपट्टीवर टाकत राज्यातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून दर्जा पटकावला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रोहित पवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज कोण हे पाहण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध महावेगाचा’ ही मोहीम राबवली. 9 मार्च ते 31 मार्च या दरम्यान नाशिक (उत्तर विभाग), छत्रपती संभाजीनगर (मध्य विभाग), नांदेड (पूर्व विभाग), सोलापूर (दक्षिण विभाग) आणि पुणे (पश्चिम विभाग) अशा पाच ठिकाणी मोहिम राबवली. यामध्ये सिनिअर व ज्युनिअर अशा दोन गटातून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील काही हजारावर गोलंदाज सहभागी झाले होते. त्यांनी ताशी 110 ते 115 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली.
Home महत्वाची बातमी रायगडचा विश्वजित ठाकूर ठरला महास्पीड गोलंदाज
रायगडचा विश्वजित ठाकूर ठरला महास्पीड गोलंदाज
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात जसप्रित बुमराह, झहीर खान, ब्रेट ली, शोएब अख्तर, ग्लेन मॅकग्रा, डॅनी मॉरिसन यांच्यासह दिग्गज खेळाडूंनी केलेली वेगवान गोलंदाजी पाहून जगभरातील क्रिकेटप्रेमी प्रभावित झाले आहेत. याच गोलंदाजांनी सामन्यांमध्ये ताशी 140 ते 155 किलो मीटर वेगाने चेंडू खेळपट्टीवर टाकल्याचेही सर्वांनी पाहिले आहे. याच वेगाची आठवण कऊन देत महाराष्ट्रातील नवजवान गोलंदाजांनी ताशी 127 […]