भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव

उचगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या विजयानंतर उचगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून  विजयोत्सव साजरा केला. उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा विजय असो, जगदीश शेट्टर यांचा विजय असो, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा प्रकारच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव […]

भाजप कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव

उचगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या विजयानंतर उचगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून  विजयोत्सव साजरा केला. उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाजपचे कार्यकर्ते एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा विजय असो, जगदीश शेट्टर यांचा विजय असो, मोदीजी आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा प्रकारच्या घोषणा देत गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.