विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या विजयाचा जल्लेष

विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या विजयाचा जल्लेष

खानापूर : कारवार मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. खानापूर तालुका भाजपच्यावतीने दुपारी 3 वाजता येथील शिवस्मारकातील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून विजयोत्सव साजरा करण्यात आला. राजा छत्रपती शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजपचे पदाधिकारी आणि आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील हे मतमोजणीसाठी कुमठा येथे गेल्याने कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
नंदगडमध्ये आनंदोत्सव
कारवार लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी मोठ्या मताधिक्याने निवडून आले. याची माहिती नंदगड येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी  जल्लोष केला.नंदगड गावातील विविध गल्लीतील प्रमुख ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन भाजप विजयाबद्दल घोषणा दिल्या. फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष केला.