बेहमई हत्याप्रकरणी 43 वर्षांनंतर निकाल

एका दोषीला जन्मठेपेची शिक्षा, फूलनदेवीसह 36 जण आरोपी वृत्तसंस्था/ कानपूर उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील प्रसिद्ध बेहमई हत्या प्रकरणात तब्बल 43 वर्षांनंतर निकाल आला आहे. या प्रकरणात एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर अन्य आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात फिर्यादीसह मुख्य आरोपी फुलन देवीसह अनेक आरोपींचा मृत्यू झाला आहे. या […]

बेहमई हत्याप्रकरणी 43 वर्षांनंतर निकाल

एका दोषीला जन्मठेपेची शिक्षा, फूलनदेवीसह 36 जण आरोपी
वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तर प्रदेशातील कानपूर देहात येथील प्रसिद्ध बेहमई हत्या प्रकरणात तब्बल 43 वर्षांनंतर निकाल आला आहे. या प्रकरणात एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर अन्य आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यात फिर्यादीसह मुख्य आरोपी फुलन देवीसह अनेक आरोपींचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एकूण 36 जणांना आरोपी करण्यात आले होते. न्यायालयाने बेहमई प्रकरणात तुऊंगात असलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी श्यामबाबू याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अन्य आरोपी विश्वनाथ याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
काय होती बेहमई घटना?
14 फेब्रुवारी 1981 रोजी कानपूर देहात येथील राजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील यमुनेच्या काठावर असलेल्या बेहमई गावात दरोडेखोर फूलनदेवीने 20 जणांना एका रांगेत उभे करून गोळ्या झाडून ठार केले होते. या खळबळजनक घटनेनंतर देश-विदेशात याची चर्चा रंगली होती. अनेक परदेशी प्रसारमाध्यमांनीही जिल्ह्यात तळ ठोकला होता. या घटनेमुळे संपूर्ण गाव आणि जिल्हा हादरला असताना याच गावात राहणारा राजाराम गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे आला. त्यांनी फूलनदेवी आणि मुस्तकीम यांच्यासह 14 जणांची नावे घेऊन 36 दरोडेखोरांविऊद्ध गुन्हा दाखल केला होता. परंतु संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी ही घटना कायदेशीर गुंतागुंतीच्या गर्तेत अडकली होती.