फॅब चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषक, जर्सीचे अनावरण

1 जूनपासून स्पर्धेला प्रारंभ : आठ संघांचा सहभाग बेळगाव : फॅब फुटबॉल अकादमी आयोजित फॅब चषक 7 ए साईड आंतरक्लब निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेच्या चषक व जर्सींचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. सीआर 7 च्या फुटबॉल मैदानावर आयोजित चषक व गणवेशाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दर्शन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक व उद्योगपती श्रीकांत देसाई बेळगाव जिल्हा […]

फॅब चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषक, जर्सीचे अनावरण

1 जूनपासून स्पर्धेला प्रारंभ : आठ संघांचा सहभाग
बेळगाव : फॅब फुटबॉल अकादमी आयोजित फॅब चषक 7 ए साईड आंतरक्लब निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेच्या चषक व जर्सींचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. सीआर 7 च्या फुटबॉल मैदानावर आयोजित चषक व गणवेशाच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दर्शन स्पोर्ट्स अकादमीचे संचालक व उद्योगपती श्रीकांत देसाई बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव अमित पाटील, सीआर 7 चे प्रशांत मन्नोळी, प्रदीप मनोरी, विजय रेडेकर, अमरदीप पाटील, साहिल मांगले व ओमकार खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 8 संघांना निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये केआर शेट्टी किंग्ज, ग्रो स्पोर्ट्स एफसी, भारत एफसी, ओल्ड फॅट एफसी, टेन-टेन एफसी, राहुल केआर शेट्टी, डिसाईडर एफससी व साईराज वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. यावेळी राहुल कलपत्री, अक्षय कुलकर्णी, राहुल पोटे, अभिषेक कसोटी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण व फुटबॉल जर्सीचे अनावरण करण्यात आले. सदर स्पर्धा 1 जूनपासून सीआर 7 टर्फ मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक, रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, गोलरक्षक, डिफेंडर, मिडफिल्डर, फॉरवर्ड व उगवता खेळाडू अशी वैयक्तिक बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार असून पहिल्या 4 संघात उपांत्य फेरी व अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे.