अनाधिकृत कसोटी मालिका बरोबरीत
वृत्तसंस्था/ बेनोनी (दक्षिण आफ्रिका)
यजमान दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ यांच्यातील दोन सामन्यांची अनाधिकृत कसोटी मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 263 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ संघाने सामन्यातील शेवटच्या दिवसाअखेर पहिल्या डावात 6 बाद 327 धावा केल्या.
या दुसऱ्या सामन्यात भारत अ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. दक्षिण आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 263 धावांत आटोपला. कर्णधार ब्रीझेकीने 4 चौकारांसह 36, हमझाने 4 चौकारांसह 20, क्विशेलीने 5 चौकारांसह 34, ऑलिव्हरने 3 चौकारांसह 23 तर व्हॅन डेकने 4 चौकारांसह 41 तसेच मोरेकीने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 42 धावा जमविल्या. भारत अ संघातर्फे अक्षर पटेलने 2 तर वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला. आवेश खानने 4 बळी मिळविले. सैनीने 1 गडी बाद केला. त्यानंतर भारत अ संघाने पहिल्या डावात 95.4 षटकात 6 बाद 327 धावा केल्या. भारत अ संघाच्या डावात तिलक वर्माने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 50, धृव ज्युरेलने 2 षटकार आणि 8 चौकारांसह 69, अक्षर पटेलने 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 50, सर्फराज खानने 6 चौकारांसह 34, रजत पाटीदारने 6 चौकारांसह 33 तसेच साई सुदर्शनने 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. कर्णधार ईश्वरनने 2 चौकारांसह 18 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक, दक्षिण आफ्रिका अ प. डाव-सर्वबाद 263, भारत अ प. डाव-6 बाद 327
Home महत्वाची बातमी अनाधिकृत कसोटी मालिका बरोबरीत
अनाधिकृत कसोटी मालिका बरोबरीत
वृत्तसंस्था/ बेनोनी (दक्षिण आफ्रिका) यजमान दक्षिण आफ्रिका अ आणि भारत अ यांच्यातील दोन सामन्यांची अनाधिकृत कसोटी मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेतील दुसरा सामना अनिर्णीत अवस्थेत संपला. या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाने पहिल्या डावात 263 धावा जमविल्या. त्यानंतर भारत अ संघाने सामन्यातील शेवटच्या दिवसाअखेर पहिल्या डावात 6 बाद 327 धावा केल्या. या दुसऱ्या सामन्यात […]