इम्रानखानला पाक निवडणूक आयोगाचा झटका

► वृत्तसंस्था / इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने झटका दिला आहे. इम्रानखान यांचे दोन उमेदवारी अर्ज आयोगाने फेटाळले आहेत. त्यांनी लाहोर आणि मियावाली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज सादर केले होते. तथापि, निवडणूक अधिकाऱ्यांनी ते फेटाळल्याने इम्रानखान यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे. तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रानखान यांना शिक्षा ठोठावण्यात आली […]

इम्रानखानला पाक निवडणूक आयोगाचा झटका

► वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने झटका दिला आहे. इम्रानखान यांचे दोन उमेदवारी अर्ज आयोगाने फेटाळले आहेत. त्यांनी लाहोर आणि मियावाली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज सादर केले होते. तथापि, निवडणूक अधिकाऱ्यांनी ते फेटाळल्याने इम्रानखान यांच्यासमोर अडचण उभी राहिली आहे.
तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रानखान यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या अर्जांवर अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या करणारे लोक त्या मतदारसंघांमधील नाहीत, असा आक्षेप इम्रानखान यांच्या विरोधकांनी घेतला होता. या आक्षेपांची पडताळणी झाल्यानंतर अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याविरोधात अद्यापही बरीच प्रकरणे प्रलंबित असून त्यांच्यापैकी अनेक प्रकरणांमध्ये त्यांची बाजू कमकुवत असल्याची चर्चा आहे. आता निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ते कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.