काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला समर्थन देण्याची उद्धव ठाकरे यांची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. या साठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अद्याप जागावाटपासाठी बैठकी होत आहे.राजकीय घडामोडीचा पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या पदाबाबत मोठी घोषणा केली …

काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला समर्थन देण्याची उद्धव ठाकरे यांची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे. या साठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून अद्याप जागावाटपासाठी बैठकी होत आहे.राजकीय घडामोडीचा पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीच्या पदाबाबत मोठी घोषणा केली आहे. 

ते म्हणाले, काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पूर्णपणे समर्थन असेल. 

महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवारपक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे आहे. 

ते म्हणाले, महाराष्ट्राचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या उमेदवाराची राज्याचा मुख्यमंत्री म्हणून निवड करतील त्याला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा पाठिंबा असेल. 

या वेळी त्यांनी भाजपवर ताशेरे ओढत जाहिरातींच्या सहाय्याने सरकार खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला. 

राज्य सरकार पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्व जाहिरातींच्या माध्यमातून राज्यात खोट्या बातम्या पसरवत आहे. तसेच राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनांच्या माध्यमातून जनतेला त्यांचाच पैसा देऊन महाराष्ट्र धर्माशी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाते. 

Edited by – Priya Dixit 

 

Go to Source