गोवंडीत पालिकेच्या कचरा ट्रकची 9 वर्षांच्या मुलाला धडक

गोवंडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलाला मंगळवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कचऱ्याच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या ट्रकची तोडफोड केली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालकाला अटक केली आहे. गोवंडीतील बैगनवाडी सिग्नल परिसरात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या परिसरात राहणारा हमीद (9) सकाळी अकराच्या सुमारास मदरशातून घरी जात होता. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या पालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने हमीदला धडक दिली. या अपघातात हमीदचा जागीच मृत्यू झाला. हमीदच्या अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी कचऱ्याच्या ट्रकची तोडफोड केली. घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. गेल्या काही वर्षांत या भागात असे अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागातील बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच येथे वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

गोवंडीत पालिकेच्या कचरा ट्रकची 9 वर्षांच्या मुलाला धडक

गोवंडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलाला मंगळवारी सकाळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कचऱ्याच्या ट्रकने धडक दिली. या अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कचऱ्याच्या ट्रकची तोडफोड केली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालकाला अटक केली आहे.गोवंडीतील बैगनवाडी सिग्नल परिसरात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. या परिसरात राहणारा हमीद (9) सकाळी अकराच्या सुमारास मदरशातून घरी जात होता. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या पालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने हमीदला धडक दिली. या अपघातात हमीदचा जागीच मृत्यू झाला.हमीदच्या अपघाताची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांनी कचऱ्याच्या ट्रकची तोडफोड केली. घटनेनंतर शिवाजी नगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.गेल्या काही वर्षांत या भागात असे अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागातील बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, तसेच येथे वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Go to Source