दोन घुसखोरांना उरीमध्ये कंठस्नान

वृत्तसंस्था~/श्रीनगर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, बीएसएफच्या जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली. सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीनंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दिवसभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली होती. उरी सेक्टरमधील गोहलन भागातून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यापूर्वी […]

दोन घुसखोरांना उरीमध्ये कंठस्नान

वृत्तसंस्था~/श्रीनगर
काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, बीएसएफच्या जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली. सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी एलओसीजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीनंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दिवसभर शोधमोहीम तीव्र करण्यात आली होती.
उरी सेक्टरमधील गोहलन भागातून घुसखोरीचा प्रयत्न केला जात असताना दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. यापूर्वी बुधवारी भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याशिवाय हल्ल्यात सहभागी असलेल्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. रियासी हल्ला प्रकरणातील ही पहिली अटक होती.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवाद्यांचे कारनामे वाढल्यानंतर सुरक्षा दलांनी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेवेळी पूंछ जिह्यातील मेंढर तहसीलमध्ये सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण सापडले आहे. येथून काही कपडे, बॅटरी आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.