जुन्या बसस्थानकावर पार्किंगसाठी प्रयत्न
मडगावचे आमदार दिगंबर कामत : सरकारी अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी
मडगाव : मडगावात शहरातील शाळा सुटण्याच्या वेळेत होणाऱ्या रहदारीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी जुन्या बसस्थानकावर विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहने उभी करता यावीत यासाठी प्रयत्न चालले आहेत असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. पार्किंगसाठी जागेची सोय करण्याच्या दृष्टीने आमदार कामत यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर जागेची पाहणी केली. सोमवापर्यंत सर्व बाबीं जाग्यावर घालण्याचे निर्देश आमदार कामत यांनी यावेळी दिले.मडगाव पालिका अभियंता दीपक फळदेसाई, कनिष्ठ अभियंता सुहास फळदेसाई, स्वच्छता निरीक्षक संजय सांगेलकर, पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य अधिकारिणींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या ठिकाणी रस्सा-ऑम्लेट तसेच अन्य खाद्यपदार्थांची विक्री करणारे गाडे 24 तास उभे केले जातात. ते आता सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेतच व्यवसाय करण्यासाठी तेथे उभे करू देण्याचे नुकत्याच रहदारीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार ते वरील वेळ झाल्यावर काढण्यास पालिकेच्या मार्केट निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. साबांखाला पदपथ आणि सभोवतालील जागेची डागडुजी करण्यास सांगितले आहे. पालिकेला झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत आवश्यक कृती करण्यास सांगण्यात आले आहे. याखेरीज रेषा आखून देऊन त्या जागेच्या आत राहूनच खाद्यविक्री व्यवसाय करण्याची सक्ती गाड्यांवर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
Home महत्वाची बातमी जुन्या बसस्थानकावर पार्किंगसाठी प्रयत्न
जुन्या बसस्थानकावर पार्किंगसाठी प्रयत्न
मडगावचे आमदार दिगंबर कामत : सरकारी अधिकाऱ्यांसमवेत जागेची पाहणी मडगाव : मडगावात शहरातील शाळा सुटण्याच्या वेळेत होणाऱ्या रहदारीच्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी जुन्या बसस्थानकावर विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहने उभी करता यावीत यासाठी प्रयत्न चालले आहेत असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. पार्किंगसाठी जागेची सोय करण्याच्या दृष्टीने आमदार कामत यांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सदर जागेची पाहणी केली. सोमवापर्यंत सर्व बाबीं जाग्यावर घालण्याचे निर्देश आमदार […]