‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चा ट्रेलर जारी

शीना हत्या प्रकरणाचे प्रत्येक पान उलटणारी सीरिज 2015 मध्ये स्वत:ची मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी यांना अटक झाल्यावर देशभरात खळबळ उडाली होती. इंद्राणी मुखर्जी आता आगामी नेटफ्लिक्स माहितीपट सीरिज ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ’मध्ये शीना बोरा हत्याप्रकरणाविषयी तपशील सादर करणार आहे. या सीरिजचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. उराज बहल आणि शाना लेवी […]

‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चा ट्रेलर जारी

शीना हत्या प्रकरणाचे प्रत्येक पान उलटणारी सीरिज
2015 मध्ये स्वत:ची मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी यांना अटक झाल्यावर देशभरात खळबळ उडाली होती. इंद्राणी मुखर्जी आता आगामी नेटफ्लिक्स माहितीपट सीरिज ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी : बरीड ट्रुथ’मध्ये शीना बोरा हत्याप्रकरणाविषयी तपशील सादर करणार आहे. या सीरिजचा ट्रेलर व्हायरल झाला आहे.
उराज बहल आणि शाना लेवी यांच्याकडून दिग्दर्शित ही सीरिज स्वत:च्या 4 एपिसोड्ससोबत शीना बोरा हत्याप्रकरणातील गुंतागुंत मांडणार आहे. अमेरिकेतील मेकमेक आणि इंडिया टुडे ग्रूपने या सीरिजची निर्मिती केली आहे. ही सीरिज 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
ही सीरिज इंद्राणी मुखर्जीचे आत्मचरित्र ‘अनब्रोकन :द अनटोल्ड स्टोरी’वर आधारित आहे. स्वत:च्या पुस्तकात इंद्राणी मुखर्जीचा जीवनपट असून यात तुरुंगात घालविलेल्या 6 वर्षांचा तपशीलही आहे. इंद्राणी सध्या जामिनावर बाहेर आहे. इंद्राणीचा विवाह मीडिया टायकून पीटर मुखर्जीसोबत झाला होता.
ही सीरिज खळबळजनक कौटुंबिक रहस्यं, दृढ नातेसंबंध, गुपिते अन् पैशांचा खेळ मांडणारी आहे. ही सीरिज कहाणीच्या दोन्ही बाजू मांडणारी आहे. यात इंद्राणी मुखर्जीसोबत तिचा परिवार, वकील आणि अनुभवी पत्रकारांच्या मुलाखतींनाही स्थान देण्यात आले आहे.