ठाणेकरांना आता पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुरेशा पावसाअभावी जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने (TMC) पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. 10 टक्के पाणी कपात (Water Cut in Thane) होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही महापालिकेने केले आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा नाही. पाणीसाठ्यात घट झाल्याने हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका क्षेत्राला बीएमसीच्या जलस्त्रोतांमधून ८५ एमएलडी पाणी मिळते. हे पाणी नौपाडा, पाचापाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर क्रमांक 1, किसन नगर क्रमांक 2, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशाख या गावांना पुरवठा केला जातो. महापालिका हद्दीतील या पाणीसाठ्यातून करवलो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं 1, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नालपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) पाण्याची टाकी, टेकडी बंगला, टेकडी बंगला, टेकडी टँकर नगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या भागात 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.या पाणीकपातीच्या काळात नागरिकांनी आवश्यक असलेला पाण्याचा साठा ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करावा आणि ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हेही वाचाMumbai Rains : विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू
पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ भागात 10 टक्के पाणी कपात