टिळकवाडी एफए, स्वस्तिक एफसी विजयी
लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी एफएने टिळकवाडी इलेव्हनचा तर ब्रदर्स एफसीने वायएमसीएचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टिळकवाडी एफएने टिळकवाडी इलेव्हनचा 3-1 असा पराभव केला. त्यात समर्थ बांधेकरने 2 तर सौरभ गवळीने 1 गोल केला. टिळकवाडी इलेव्हनतर्फे प्रज्वल सेठने 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात ब्रदर्स एफसीने वायएमसीएचा 13-0 असा पराभव केला. त्यात जयेश सांब्रेकरने 5, फैक जलालीने 3, फर्दिन अनगोळकर, किरण निकम, इक्लास अॅलिन अॅथोनी, शोएबअख्तर गवस यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
Home महत्वाची बातमी टिळकवाडी एफए, स्वस्तिक एफसी विजयी
टिळकवाडी एफए, स्वस्तिक एफसी विजयी
लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी एफएने टिळकवाडी इलेव्हनचा तर ब्रदर्स एफसीने वायएमसीएचा पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. स्पोर्टींग प्लॅनेट मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात टिळकवाडी एफएने टिळकवाडी इलेव्हनचा 3-1 […]