गजानन महाराज प्रगट दिन भक्तीभावाने साजरा
सामुदायिक पारायण, प्रवचन, पालखी सोहळा साजरा : महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ
बेळगाव : शांतीनगर, मंडोळी रोड येथील श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे 146 वा प्रगट दिन उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी पहाटे 6 वाजता काकडारती, दुग्धाभिषेक, श्री गजानन विजयग्रंथ अध्याय 1 ते 17 चे सामुदायिक पारायण, दुपारी 1 वाजता श्रींची आरती व सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा झाला. रविवार दि. 3 मार्च रोजी प्रगट दिनाच्या मुख्य उत्सवादिवशी पहाटे 6 वाजता काकडारती, दुग्धाभिषेक, गजानन विजयग्रंथ 18 ते 21 चे सामुदायिक पारायण व प्रा. विजया धोपेश्वरकर यांचे प्रवचन झाले. दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती झाल्यानंतर 12.30 ते 3 महाप्रसाद झाला. सायंकाळी 6 वा. दैनंदिन उपासनेनंतर 7 वा. आरती झाली. 10 वा. श्रींच्या शेजारतीने उत्सवाची सांगता झाली. दुपारी आयोजित महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Home महत्वाची बातमी गजानन महाराज प्रगट दिन भक्तीभावाने साजरा
गजानन महाराज प्रगट दिन भक्तीभावाने साजरा
सामुदायिक पारायण, प्रवचन, पालखी सोहळा साजरा : महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ बेळगाव : शांतीनगर, मंडोळी रोड येथील श्री गजानन महाराज भक्त परिवार केंद्रातर्फे 146 वा प्रगट दिन उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शनिवारी पहाटे 6 वाजता काकडारती, दुग्धाभिषेक, श्री गजानन विजयग्रंथ अध्याय 1 ते 17 चे सामुदायिक पारायण, दुपारी 1 वाजता श्रींची […]