पिकनिकसाठी आलेल्यांवर काळाचा घाला! राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तीघेजण बुडाले

मृतात एक पुरुष दोन महिलांचा समावेश राधानगरी/ प्रतिनिधी राधानगरी धरणाच्या ओलवण-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये  बुडुन तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये तळंदगे ता. हातकणंगले येथील दोघींचा तर एम.आय.डी.सी. कागल येथील एकाचा समावेश आहे.  हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असुन पाण्यात बुडताना वाचविताना या तिघांचा बुडुन मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस […]

पिकनिकसाठी आलेल्यांवर काळाचा घाला! राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तीघेजण बुडाले

मृतात एक पुरुष दोन महिलांचा समावेश

राधानगरी/ प्रतिनिधी

राधानगरी धरणाच्या ओलवण-भटवाडी येथील बॅकवॉटरमध्ये  बुडुन तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये तळंदगे ता. हातकणंगले येथील दोघींचा तर एम.आय.डी.सी. कागल येथील एकाचा समावेश आहे.  हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असुन पाण्यात बुडताना वाचविताना या तिघांचा बुडुन मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
काल बुधवारी  सतिश लक्ष्मण टिपुगडे (वय२६) रा. भैरीबांबर ता.राधानगरी सध्या रा.एम.आय.डी.सी कागल यांनी ओलवण येथील आपल्या नातेवाईकांना भाकरी करण्यास सांगितले होते, या भाकरी घेऊन भटवाडी बॅकवाँटरजवळ जेवण करण्याचा बेत आखला होता.  त्यांच्यासोबत अश्विनी राजेंद्र मालवेकर (वय३२), प्रतिक्षा राजेंद्र मालवेकर (वय१३) रा. तळदगे ता. हातकणंगले या दोघी होत्या. भाकरी नेण्यासाठी सतिश का आला नाही, ही माहीती घेण्यासाठी नातेवाईक गेले असता याठिकाणी सतिशचे प्रेत तरंगताना दिसले. सकाळी अश्विनी व प्रतिक्षा  मालवेकर या दोघी आढळुन आल्या
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या घटनेचे नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असुन अधिक तपास डी वाय एस पी शाहूवाडी विभागाचे आपासो पाटील व पो.नि.संतोष गोरे करत आहेत. आठवडाभरामध्ये पाण्यात बुडुन मृत्यू झालेल्याची संख्या चारवर पोहोचली आहे. चार, पाच दिवसापुर्वी काळम्मावाडी धरणाजवळ सेल्फी काढताना पाय घसरुन पडुन एकाचा मृत्यू झाला होता.