मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक
गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. 11 ते 13 जुलैदरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.ब्लॉक कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन पर्यायी मार्गांनी प्रवास करता येणार आहे. त्यामध्ये वाकण फाटा येथून भिसे खिंड – रोहा – कोलाडमार्गे पुन्हा मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करता येईल. तसेच वाकण फाटा येथून पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली – रवाळजे – निजामपूर – माणगाववरून वाहने वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली – पाली – वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.तर ब्लॉक कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. कोलाड येथून कालाड – रोहा – भिसे खिंड – वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर कोलाड येथून रवाळजे – पालीवरून वळून वाकण – पाली – खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांना प्रवास करता येईल. तसेच कोलाड येथून रवाळजे – पाली – वाकण फाटावरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. प्रवाशांनी ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.हेही वाचाठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन
आषाढी एकादशीनिमित्त दादर आणि वडाळ्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते बंद
Home महत्वाची बातमी मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक
मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक
गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. 11 ते 13 जुलैदरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या दोन सत्रात ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
ब्लॉक कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन पर्यायी मार्गांनी प्रवास करता येणार आहे. त्यामध्ये वाकण फाटा येथून भिसे खिंड – रोहा – कोलाडमार्गे पुन्हा मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करता येईल.
तसेच वाकण फाटा येथून पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली – रवाळजे – निजामपूर – माणगाववरून वाहने वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली – पाली – वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.
तर ब्लॉक कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. कोलाड येथून कालाड – रोहा – भिसे खिंड – वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. तर कोलाड येथून रवाळजे – पालीवरून वळून वाकण – पाली – खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून वाहनांना प्रवास करता येईल.
तसेच कोलाड येथून रवाळजे – पाली – वाकण फाटावरून वळवून मुंबई – गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल. प्रवाशांनी ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्ग वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.हेही वाचा
ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनआषाढी एकादशीनिमित्त दादर आणि वडाळ्यातील ‘हे’ प्रमुख रस्ते बंद