शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपचे ध्येय

शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपचे ध्येय

विशाल परब यांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात मळगाव येथे प्रतिपादन
सावंतवाडी । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगीण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, तसेच खासदार नारायण राणे मागील काही वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोकणी जनतेनेही भाजपावर विश्वास टाकला आहे. या जनतेप्रती असणारी कृतज्ञता म्हणून पालकांवर असणारा ताण कमी करत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मळगाव इंग्लिश हायस्कूल येथे केले .विशाल परब यांच्या संकल्पनेतून मळगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्यासमवेत या कार्यक्रमात ॲड.अनिल निरवडेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, दिपक जोशी, निलकंठ बुगडे, माजी पंचायत समिती सदस्य राजू परब, मुख्याध्यापक मारुती फाले, चेअरमन मनोहर राऊळ, श्री गजा सावंत, शाम सांगेलकर, सिद्धेश राऊळ, सुनील कदम आदी मान्यवर उपस्थित होते.