‘ते’ तीन नगरसेवक उत्पन्नाची माहिती लवकरच देणार

बेळगाव : नगरसेवकांना दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा लेखाजोखा महानगरपालिकेकडे द्यावा लागतो. मात्र तीन नगरसेवकांनी अजून लेखाजोखा दिला नाही. ते लवकरच आपल्या संपूर्ण उत्पन्नाचे विवरण देणार आहेत. तो संपूर्ण अहवाल महापौर सविता कांबळे यांच्याकडे दोन दिवसात दिला जाईल, असे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांनी दरवर्षी आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती महानगरपालिकेला दिली पाहिजे. त्यानुसार 55 नगरसेवकांनी […]

‘ते’ तीन नगरसेवक उत्पन्नाची माहिती लवकरच देणार

बेळगाव : नगरसेवकांना दरवर्षी आपल्या उत्पन्नाचा लेखाजोखा महानगरपालिकेकडे द्यावा लागतो. मात्र तीन नगरसेवकांनी अजून लेखाजोखा दिला नाही. ते लवकरच आपल्या संपूर्ण उत्पन्नाचे विवरण देणार आहेत. तो संपूर्ण अहवाल महापौर सविता कांबळे यांच्याकडे दोन दिवसात दिला जाईल, असे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या 58 नगरसेवकांनी दरवर्षी आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती महानगरपालिकेला दिली पाहिजे. त्यानुसार 55 नगरसेवकांनी आपल्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. केवळ तीन नगरसेवकांनी आपले विवरण देण्यास विलंब केला आहे. मात्र आता दोनच दिवसात ते विवरण देणार असून संबंधित संपूर्ण माहिती दिल्यानंतर महापौर सविता कांबळे यांच्याकडे ती दिली जाणार आहे. दरवर्षीच आता नगरसेवकांना आपल्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे काही नगरसेवक नाराजी व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच याची माहिती मागविण्यात येते, मात्र बरेच जण त्याला विलंब करत आहेत. मात्र आता बहुसंख्य नगरसेवकांनी त्याची तयारी पूर्ण केली असून, सर्व नगरसेवकांचा अहवाल दाखल होणार आहे.