IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातच्या या खेळाडूचा झाला अपघात

कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्याने आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर गेल्याने गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. IPL 2024 च्या लिलावात 3.60 कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिन्झ रस्ता अपघातात जखमी झाला आहे

IPL सुरू होण्यापूर्वी गुजरातच्या या खेळाडूचा झाला अपघात

कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्याने आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर गेल्याने गुजरात टायटन्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. IPL 2024 च्या लिलावात 3.60 कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिन्झ रस्ता अपघातात जखमी झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी झुंज दिल्यानंतर त्याला गुजरातने विकत घेतले

 

मिंज हा मोठा हिटर मानला जातो. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती आणि तो 3.60 कोटी रुपयांना विकला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 वर्षीय मिंजला सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मिंज हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. 

 

झारखंडमध्ये तो सुपरबाईक चालवत असताना ही घटना घडली. रिपोर्टनुसार, त्याची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. दरम्यान, मिंजचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मिन्झचे वडील फ्रान्सिस मिन्झ यांनी आपल्या मुलाच्या दुखापतीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र,असे काही गंभीर नाही. डॉक्टर त्याची काळजी घेत आहेत.

 

अपघातानंतर सुपरबाईकचा पुढील भाग खराब झाला होता. त्याचवेळी मिंजच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.22 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेपॉकमध्ये गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. गुजरात टायटन्स अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. हार्दिक मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे

 

Edited By- Priya Dixit 

 

 

Go to Source