तेराशेवेळा कारागृहात

तेराशेवेळा कारागृहात

कोणता ना कोणता विक्रम करण्याची हौस अनेकांची असते हे आपल्याला माहिती आहे. विक्रम अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यात जे अधिक वैशिष्ट्यापूर्ण आणि अनोखे असतात त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये केली जाते. ही विक्रम पुस्तिका पाहिली तर आपण आवाक् होऊन जातो. कारण इतक्या प्रकारचे विक्रम केले जाऊ शकतात, याची आपल्याला माहितीही नसते.
अमेरिकेत एक असा व्यक्ती आहे, की ज्याला कारागृहात जाण्याचा जणू छंदच आहे. ज्याठिकाणी कोणालाही एकदा सुद्धा जावे लागू नये असे वाटत असते अशा कारागृह नामक स्थानी हा व्यक्ती त्याच्या 74 वर्षांच्या आयुष्यात तब्बल 1 हजार 300 वेळा जाऊन आला आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या आयुष्यातील 6 हजार दिवस कारागृहात काढले आहेत. त्याने सर्वाधिकवेळा कारागृहात जाण्याचा विक्रमच केला आहे, असे बोलले जाते. नुकतेच या व्यक्तीचे निधन झाले आहे. मात्र, निधनानंतरही त्याच्या कारागृहवासाच्या विक्रमाची चर्चा समाजात होतच आहे.
हेन्री अर्ल असे या व्यक्तीचे नाव आहे. 18 व्या वर्षी त्याची आई गेली. त्यानंतर त्याला मद्यपानाचे व्यसन लागले. दारुला लागणारा पैसा मिळविण्यासाठी त्याने छोटेमोठे गुन्हे करण्यास प्रारंभ केला. वयाच्या 20 व्या वर्षी त्याला प्रथम कारागृहात जावे लागले. तेव्हापासून मृत्यूपूर्वी 7 वर्षपर्यंत तो 1 हजार 300 वेळा कारागृहात केला. दारु पिऊन दंगा केल्याच्या गुन्ह्याखाली त्याला 2017 मध्ये कारावासाची शिक्षा झाली. तो त्याचा अखेरचा कारावास ठरला.