राज्यातील सरकार चार वर्षे सुरक्षित राहणार
मंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रतिक्रिया : लोकसभेच्या 15 ते 20 जागांवर विजयाचा विश्वास
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणखी चार वर्षे सुरक्षित राहणार आहे. सरकार पडण्याचा प्रश्नच नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरून आपल्यामध्ये वाद आहे हे खरे आहे. मात्र हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हे बाहेरील भांडण नाही. पक्षांतर्गत वाद आहेत. सत्ताधारी पक्षामध्ये समस्या असतातच. यामुळे सरकार पडणार असे म्हणणे चुकीचे आहे. कर्नाटकची महाराष्ट्राशी तुलना करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलण्याचा अधिकार आहे. भाजपमध्ये असे मतभेद नाहीत का?, त्यांच्या पक्षातील नेत्यांनी कोणकोणती विधाने केली, हे ठाऊक नाही का? महाराष्ट्रातील राजकारण वेगळे आहे, त्याची तुलना कर्नाटकाशी करता येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. केवळ मतभिन्नता असल्याने सरकार पडेल का? असा सवालही त्यांनी केला आहे. आमदारांमध्ये असमाधान आहे. यामुळेही सरकार पडणार नाही. विकास व बदल्यांच्या विषयावरून समस्या आहेत. पक्षामध्ये असलेली असंतुष्टता वरिष्ठांकडून दूर केली जाईल. आपल्या टप्प्यात असणाऱ्या समस्या आपणच दूर करतो, असे त्यांनी सांगितले.
15-20 जागांवर विजय मिळणार
लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागल्यास मुख्यमंत्री राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राज्याच्या इतिहासामध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये पराभव झाल्यास मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे उदाहरण नाही. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस उत्तम प्रकारे कार्य करत आहे. यामुळेच लोकसभा निवडणुकीत जनता निर्णय देणार आहे. आपण 15 ते 20 जागांवर विजय संपादन करू, असा विश्वासही मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
Home महत्वाची बातमी राज्यातील सरकार चार वर्षे सुरक्षित राहणार
राज्यातील सरकार चार वर्षे सुरक्षित राहणार
मंत्री सतीश जारकीहोळी यांची प्रतिक्रिया : लोकसभेच्या 15 ते 20 जागांवर विजयाचा विश्वास बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकार आणखी चार वर्षे सुरक्षित राहणार आहे. सरकार पडण्याचा प्रश्नच नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरून आपल्यामध्ये वाद आहे हे […]