सिक्कीम विधानसभा पूर्णपणे विरोधक मुक्त
सिक्कीम विधानसभा पूर्णपणे विरोधक मुक्त
वृत्तसंस्था/ गंगटोक
सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे एकमेव आमदार तेनजिंग नोरबू लाम्था हे बुधवारी राज्यातील सत्तारुढ सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) या पक्षात सामील झाले. जनतेचा कल मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वाखालील एसकेएमच्या बाजूने असल्याचे लाम्था यांनी म्हटले आहे. लाम्था हे एसकेएमध्ये सामील झाल्याने सिक्कीम विधानसभेत आता कुणीच विरोधक राहणार नाही, कारण एसकेएमचेच सर्व 32 आमदार असतील.
मतदारांशी सल्लामसलत केल्यावर मला एसकेएममध्ये सामील होण्याची सूचना करण्यात आली, कारण सत्तारुढ पक्षाच्या बाजूनेच जनता आहे. एसकेएम सरकारने मागील 5 वर्षांमध्ये राज्याचा विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी प्रभावी कार्य केले आहे. याचमुळे एसकेएमला जनतेने पुन्हा प्रचंड बहुमत दिले असल्याचे लाम्था यांनी मुख्यमंत्री तमांग यांचे कौतुक करताना म्हटले आहे.
सिक्कीम विधानसभेत आणि बाहेर एसकेएमला विरोध करण्याची कुठलीच आवश्यकता नसल्याचा स्पष्ट संदेश लोकांनी दिला असल्याचा दावा श्यारीचे आमदार लाम्था यांनी केला आहे. लाम्था यांनी स्वत:च्या मतदारसंघाशी निगडित अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. मतदारसंघ आणि तेथील लोकांसाठी व्यापक विकास योजनेचा विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री तमांग यांनी म्हटले आहे.
यापूर्वी एसकेएमने 32 सदस्यीय विधानसभेत 31 जागा जिंकल्या होत्या. तर विरोधी पक्ष एसडीएफला केवळ एक जागा मिळाली होती. परंतु या आमदाराने देखील सत्तारुढ पक्षात प्रवेश केल्याने राज्य विधानसभेत आता विरोधकच शिल्लक राहिले नाहीत.
Home महत्वाची बातमी सिक्कीम विधानसभा पूर्णपणे विरोधक मुक्त
सिक्कीम विधानसभा पूर्णपणे विरोधक मुक्त
सिक्कीम विधानसभा पूर्णपणे विरोधक मुक्त वृत्तसंस्था/ गंगटोक सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे एकमेव आमदार तेनजिंग नोरबू लाम्था हे बुधवारी राज्यातील सत्तारुढ सिक्किम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) या पक्षात सामील झाले. जनतेचा कल मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वाखालील एसकेएमच्या बाजूने असल्याचे लाम्था यांनी म्हटले आहे. लाम्था हे एसकेएमध्ये सामील झाल्याने सिक्कीम विधानसभेत आता कुणीच विरोधक राहणार नाही, कारण एसकेएमचेच […]