वरळी हिट अँड रन प्रकरण: पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर

वरळी हिट अँड रन प्रकरण: पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबईतील (Mumbai) वरळी (Worli) परिसरात रविवारी (7 जुलै) सकाळी भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका महिलेला चिरडले. या घटनेत कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मुंबईतील कोस्टल रोडची (Coastal Road) पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना वरळी दुर्घटनेबाबत तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबाबतही विचारणा करण्यात आली. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडितेच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?पहिल्याच दिवसापासून वरळी हिट अँड रन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे तसेच रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बारवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या प्रकरणातही मी असेच आदेश दिले होते. त्यानंतर झालेली कारवाई सर्वांनी पाहिली. वरळी प्रकरणातही कारवाई सुरू आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. ते आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांना कोणतीही मदत हवी असेल, मग ती कायदेशीर असो, आर्थिक असो, त्यांना मदत केली जाईल.अस्लम शेख यांनी मदतीची मागणीयापूर्वी काँग्रेस (Congress) नेते अस्लम शेख (Aslam Shekh) यांनी विधानभवनात वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. ते म्हणाले की, मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांना त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचा अपघाती मृत्यू होऊन दोन दिवस उलटूनही सरकारकडून मदत मिळत नसेल, तर सरकारला ‘सामान्य लोकांचे सरकार’ असे बोलण्याचा अधिकार आहे का, याचा विचार सरकारने करायला हवा. हेही वाचावरळी हिट अँड रन प्रकरण: मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
वरळी BMW अपघातातील आरोपी मिहिर शाहला अटक

Go to Source