‘मेगन’चा सीक्वेल येणार पुढील वर्षी होणार प्रदर्शित
एटॉमिक मॉन्स्टर आणि ब्लमहाउस फिल्म्सकडून आता ‘सोलमेट’ चित्रपट निर्माण केला जात आहे. हा एक थ्रिलरपट असून यात तंत्रज्ञानावर आधारित कहाणी दिसून येणार आहे. सोलमेट एका अशा व्यक्तीवर आधारित आहे, जो स्वत:च्या पत्नीच्या मृत्यूनंतर सावरण्यासाठी एक बुद्धिमान अँड्राईड प्राप्त करतो. एक वास्तकि संवेदनशील साथीदार बनण्याच्या प्रयत्नात तो अजाणतेपणी एक हानिरहित लवबॉटला एक घातक सोलमेटमध्ये बदलतो असे या चित्रपटात दाखविले जाणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन केट डोलन करणार आहे. हा चित्रपट 2 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. राफेल जॉर्डनकडून या चित्रपटाची कहाणी लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाला नाते आणि एकाकीपणाच्या शोधाच्या स्वरुपात पाहते. तांत्रिक प्रगती झाल्यावरही स्थायी मानवी सत्यं आहेत, ज्यापासून आम्ही पळ काढू शकत नाही असे डोलनने म्हटले आहे.
या चित्रपटाची निर्मिती जेम्स वान आणि जेसन ब्लम करणार आहेत. तर मायकल क्लियर, जडसन स्कॉट आणि बिसू हे कार्यकारी निर्माते असतील. यापूर्वी मेगन हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर 1512 कोटी रुपयांची कमाई केली होती. याचा सीक्वेल मेगन 2.0 पुढी लवर्षी प्रदर्शित होणार आहे. मेगन 2.0 मध्ये एलीसन विलियम्स आणि वायलेट मॅकग्रॉ स्टार्स परतणार आहे.
Home महत्वाची बातमी ‘मेगन’चा सीक्वेल येणार पुढील वर्षी होणार प्रदर्शित
‘मेगन’चा सीक्वेल येणार पुढील वर्षी होणार प्रदर्शित
एटॉमिक मॉन्स्टर आणि ब्लमहाउस फिल्म्सकडून आता ‘सोलमेट’ चित्रपट निर्माण केला जात आहे. हा एक थ्रिलरपट असून यात तंत्रज्ञानावर आधारित कहाणी दिसून येणार आहे. सोलमेट एका अशा व्यक्तीवर आधारित आहे, जो स्वत:च्या पत्नीच्या मृत्यूनंतर सावरण्यासाठी एक बुद्धिमान अँड्राईड प्राप्त करतो. एक वास्तकि संवेदनशील साथीदार बनण्याच्या प्रयत्नात तो अजाणतेपणी एक हानिरहित लवबॉटला एक घातक सोलमेटमध्ये बदलतो असे […]