चालत्या ट्रेनमधून पडणाऱ्याला प्रवाशाला आरपीएफ जवानाने वाचविले, व्हिडीओ व्हायरल!
नातेवाईकांना सोडण्यासाठी लोक रेल्वे स्थानकावर येतात. येथे अनेकवेळा ट्रेन थोडा वेळ थांबल्यावर रेल्वेच्या बोगीमध्ये चढतात. ट्रेनमध्ये चढताना अनेकदा अपघात घडतात. असेच काहीसे घडले आहे. गोंदिया जंक्शन मध्ये घडला आहे. येथे ट्रेनमधून उतरताना एका व्यक्तीचा पाय घसरला आणि ट्रेनच्या खाली येत्नर की तेथे उपस्थित असलेल्या आरपीएफचे जवान देवदूत बनून आले आणि त्याचा जीव वाचवला.
ही घटना 23 ऑगस्ट रोजीची आहे. शिर्डी एक्सप्रेस दुपारी 2.15 वाजता गोंदियाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर पोहोचली. येथे 3 मिनिटांच्या थांब्यानंतर, ट्रेन 2:18 ला स्थानकातून निघू लागली. दरम्यान, घाबरलेल्या एका प्रवाशाने ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्मवर पडला तो ट्रेनच्या खाली जाणार तेवढ्यात तिथे कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल त्यांच्या दिशेने धावत गेल्या आणि त्यांना हेडकॉन्स्टेबलच्या मदतीने बाहेर ओढून काढले.
आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना गोंदिया स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Edited By – Priya Dixit