Haryana Assembly Election: निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्याची भाजपची मागणी या तारखेला होऊ शकते निवडणूक!

हरियाणातील आगामी निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार आता 7 किंवा 8 ऑक्टोबरला निवडणुका होऊ शकतात. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी केली आहे, त्यानंतर निवडणूक आयोग त्यावर विचार करत आहे.

मंगळवारी निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या संभाव्य निर्णयाचा सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या निवडणूक रणनीतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आता मंगळवारी होणाऱ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात हरियाणातील मतदार कोणत्या दिवशी मतदान करणार हे स्पष्ट होणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी 1 ऑक्टोबरच्या आसपास वीकेंड आणि सुट्ट्या असल्याचं मत मांडलं आहे. त्यामुळे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात, त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. पुढील तारीख ठरवताना मतदानाच्या तारखेच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी नसावी, हे ध्यानात ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. असे झाल्यास जास्तीत जास्त लोक मतदानात भाग घेऊ शकतील.हे त्यांचे म्हणणे आहे. 

याआधी लोकसभा निवडणुकीत उष्णतेमुळे मतदानाची टक्केवारी सुमारे पाच टक्क्यांनी घसरली होती. 25 मे रोजी कडक उष्मा होता आणि लोक मतदानासाठी घराबाहेर पडले नाहीत. 2019 मध्ये जवळपास 70 टक्के मतदान झाले होते, तर गेल्या मे महिन्यात 65 टक्के मतदान झाले होते.या कारणास्तव भाजपने निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. 

Edited By – Priya Dixit 

Go to Source