पाच-दोन फार्म्युल्याला विरोधी गटाची मान्यता

मनपा स्थायी समितीच्या निवडीसाठी आमदार राजू सेठ यांच्याशी बैठक प्रतिनिधी/ बेळगाव महानगरपालिकेतील चार स्थायी समितींची निवडणूक दि. 2 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजप गटाने 5-2 फार्म्युल्याचा प्रस्ताव विरोधी गटाला दिला होता. त्यानंतर विरोधी गटाने आमदार राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्याला […]

पाच-दोन फार्म्युल्याला विरोधी गटाची मान्यता

मनपा स्थायी समितीच्या निवडीसाठी आमदार राजू सेठ यांच्याशी बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेतील चार स्थायी समितींची निवडणूक दि. 2 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झाली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी भाजप गटाने 5-2 फार्म्युल्याचा प्रस्ताव विरोधी गटाला दिला होता. त्यानंतर विरोधी गटाने आमदार राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्याला मान्यता दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
महानगरपालिकेतील शिक्षण व आरोग्य, अर्थ व कर, लेखा व सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपबरोबरच विरोधी गटातील नगरसेवकांनी तयारी केली आहे. जास्तीतजास्त बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठीच साऱ्यांचेच प्रयत्न सुरू आहेत. भाजप नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने विरोधी गटाला त्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक करावी लागणार आहे.
भाजपने यापूर्वीच हा फार्म्युला विरोधी गटाला दिला होता. विरोधी गटाने याबाबत विचारविनिमय करून निर्णय देण्याचे सांगितले होते. त्यानुसार आमदार राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली आहेत. विरोधी गटनेते मुझम्मील डोणी, अजिम पटवेगार, रवी साळुंखे यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी त्याला मान्यता देऊन तसा प्रस्ताव सत्ताधारी गटाकडे पाठविला आहे. सत्ताधारी गट त्याला आता होकार देणार का? हे लवकरच समजणार आहे.