अयोध्येत रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली!

तपोभूमी पीठाधीश्वर पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्यांचे प्रतिपादन पणजी : आज अयोध्येत गोव्याचे प्रतिनिधित्व करताना अत्यंत आनंद होत आहे. राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या सक्रिय व यशस्वी नेतृत्वाखाली गोव्यातील जे कारसेवक अयोध्येत आंदोलनासाठी आले होते, त्यांनी जे कष्ट काढले ते आज फळाले आले. आज अयोध्येत रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे, असे संबोधन पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. अयोध्येत श्रीराममंदिर […]

अयोध्येत रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली!

तपोभूमी पीठाधीश्वर पद्मश्री ब्रह्मेशानंदाचार्यांचे प्रतिपादन
पणजी : आज अयोध्येत गोव्याचे प्रतिनिधित्व करताना अत्यंत आनंद होत आहे. राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या सक्रिय व यशस्वी नेतृत्वाखाली गोव्यातील जे कारसेवक अयोध्येत आंदोलनासाठी आले होते, त्यांनी जे कष्ट काढले ते आज फळाले आले. आज अयोध्येत रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे, असे संबोधन पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण होऊन काल सोमवारच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्वामीजी बोलत होते.
 भारताच्या वैभवाची प्राणप्रतिष्ठा
एकेकाळी रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे ! अशा घोषणा ऐकायला यायच्या. आज त्यांचे स्वप्न साकार झालेलं आहे. प्रभु श्रीराम अयोध्येत येऊन प्रतिष्ठापित झालेले आहेत. भारताच्या सांस्कृतिक गत गौरवाची ही प्राणप्रतिष्ठा आहे. या सोहळ्यात हिंदू होतेच पण मुस्लीम, जैन, शिख अशा सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी झाले होते. श्रीरामांचा आदर्श का असावा तर राम हा सर्वांचा आहे. आपला देश सर्वांना सोबत घेऊन पुढे जावा आणि त्याला आपण रामराज्य म्हणतो. असे संबोधन  ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. स्वामीजी म्हणाले की, पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर श्रीरामांच्या जन्मभूमीचे मंदिर निर्माण होत आहे आणि त्यासाठी संघर्ष तो किती करावा लागला यावर सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. आज अयोध्येत रामराज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. झोपडीत होते प्रभु श्रीराम, पण आज भव्य-दिव्य मंदिरात प्रतिष्ठापित झालेला हा क्षण पाहून आनंदाश्रुंनी डोळे पाणावले.
गोव्यासाठी महत्त्वाचा दिवस
गोव्यासाठी हा दिवस किंवा सोहळा यासाठी महत्त्वाचा होता की, श्रीरामाचा आदर्श समोर ठेवून आम्ही पाहिलं तर गोव्यात सर्व धर्माचे लोक त्याचप्रकारे एकत्रित वावरताना दिसतात. अशाच प्रकारे आम्ही सर्वांनी भारतीय म्हणून देशासाठी एकत्रित आले पाहिजे. असेही पूज्य स्वामीजींनी उद्बोधन केले. अशा या ऐतिहासिक सोहळ्याला श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टद्वारे श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे, समस्त गोमंतकीय हिंदूधर्माभिमानीयांच्या वतीने पूजनीय स्वामीजींची या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सोहळ्यास गोव्याहून एकमेव संत म्हणून उपस्थित होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ संपन्न झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संत-महंतांना अभिवादन करत असताना सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचेही आशीर्वाद प्राप्त केले.