8 कंपन्यांचे बाजारमूल्य 2 लाख कोटांनी घटले
वृत्तसंस्था/ मुंबई
मागच्या आठवड्यामध्ये शेअर- बाजारात आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.08 लाख कोटी रुपयांनी घटलेले पहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे झालेले पहायला मिळाले. यांच्यासोबत आयटीसी, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बाजारमूल्यात मागच्या आठवड्यात घसरण पहायला मिळाली. दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे बाजारमूल्य मात्र वधारलेले होते. मागच्या आठवड्यात 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1449 अंकांनी घसरलेला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 67792 कोटीनी घटून 19,34,717 कोटी रुपयांवर घसरले होते. टीसीएसचे बाजारमूल्य 65577 कोटींनी घटून 13,27,657 कोटी रुपयांवर राहिले होते. इन्फोसिसच्या बाजारमूल्यात 24338 कोटी आणि आयटीसीच्या बाजारमुल्यात 12422 कोटींची घसरण पहायला मिळाली.
Home महत्वाची बातमी 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 2 लाख कोटांनी घटले
8 कंपन्यांचे बाजारमूल्य 2 लाख कोटांनी घटले
वृत्तसंस्था/ मुंबई मागच्या आठवड्यामध्ये शेअर- बाजारात आघाडीवरच्या दहापैकी 8 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.08 लाख कोटी रुपयांनी घटलेले पहायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि इन्फोसिस यांचे झालेले पहायला मिळाले. यांच्यासोबत आयटीसी, एलआयसी, हिंदुस्थान युनिलिव्हर इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बाजारमूल्यात मागच्या आठवड्यात घसरण पहायला मिळाली. दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक […]