शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, महिला पत्रकाराबद्दल केले आक्षेपार्ह वक्तव्य
vaman mhatre facebook
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरच्या शाळेमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर परिस्थिती चिघळली आहे सर्वत्र वातावरण पेटले आहे.नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लोकांनी आंदोलन केले आहे. आरोपीला फाशीवर देण्याची मागणी नागरिक आणि पालक करत आहे. आरोपीला अटक केली आहे.
प्रसार माध्यमातून हे प्रकरण समोर आल्यामुळे राज्य सरकार जागे झाले आहे.सर्वत्र वातावरण संतप्त असताना, शिंदे गटाचे नेता आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेवर महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत.
महिला पत्रकार वार्तांकन करत असताना, शिंदे गटाचे नेता वामन म्हात्रे महिला पत्रकाराला म्हणाले, तू अशा बातम्या देत आहेस जणूं तुझ्यावरच बलात्कार झाला आहे. अशा वक्तव्याने पत्रकार तीव्र निषेध करत आहे. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आणि ते या प्रकरणाबाबत संवेदनशील आहे मात्र त्यांच्या गटातील नेत्याचे असे वक्तव्य देणे निंदनीय आहे.वामन म्हात्रे यांनी या बाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
Edited by – Priya Dixit