मुंबईत खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, आरोपीला अटक
बदलापूरचे चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना खार मध्ये दोन अल्पवयीन मुलींचे विनयभंग करण्याची घटना घडली आहे.खारच्या दांडा परिसरात दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींचे विनयभंग करणाऱ्या शेजाऱ्याला अटक केली आहे.आरोपी मुलींच्या शेजारी राहतो आणि स्वयंपाक बनवण्याचे काम करतो. दोन घर सोडून आरोपी राहतो. मुलींच्या घरी त्यांची आजी होती. मुलींचे वय 6 वर्ष आणि 12 वर्ष असे आहे.
आरोपीने मंगळवारी सहा वर्षाच्या चिमुकलीला जीभ दाखवून घरात बळजबरी शिरला आणि मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. घरात मुलीच्या आजीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने त्यांना धमकावले .मुलीने सर्व माहिती आपल्या पालकांना फोन वरून दिली.
मुलींचे पालक कामावरून आल्यावर मुलीने घडलेले सांगितले. त्यावेळी आरोपी ने मागील शनिवारी खिडकीतून डोकावून इशारे केल्याचे सांगितले. मुलींच्या आई वडिलांनी तातडीनं खार पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपीची तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited by – Priya Dixit