ऱात्रीस खेळ चाले…म्हणत मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीयो संजय राऊतांकडून व्हायरल!

राज्यात सत्ताधाऱ्यांडून निवडणुकीमध्ये पैशाचा वरेमाप वापर करण्यात येत असून निवडणुक आयोगाने मात्रव डोळ्यावर पट्टी बांधली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नविन आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. आपल्या एक्स या सोशलमीडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करताना मुख्यमंत्री निवडणुकांसाठी मुंबईहून पैसे घेऊन आल्याचा आरोप केला. लोकसभेच्या […]

ऱात्रीस खेळ चाले…म्हणत मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीयो संजय राऊतांकडून व्हायरल!

राज्यात सत्ताधाऱ्यांडून निवडणुकीमध्ये पैशाचा वरेमाप वापर करण्यात येत असून निवडणुक आयोगाने मात्रव डोळ्यावर पट्टी बांधली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता नविन आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. आपल्या एक्स या सोशलमीडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करताना मुख्यमंत्री निवडणुकांसाठी मुंबईहून पैसे घेऊन आल्याचा आरोप केला.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. देशभरात यानिमित्ताने राजकिय नेत्यांची हेलिकॉप्टर उड्डाणे आता चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आता एका नव्या वादामध्ये घेतले जात आहे.
महाविकास आघाडीकडून सत्ताधारी नेत्यांवर निवडणुकांसाठी पैशाचा अमाप वापर केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. यासाठी ठिकठिकाणी निदर्शनेही केली जात आहेत. पुण्यात भाजपकडून पैशाचे वाटप केले जात असल्याचा आरोप करत पुणे लोकसभेचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. तसेच राज्यभरातूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून यासंदर्भातील व्हीडीयो जारी केले गेले आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते हेलिकॉप्टरने उतरताना त्याचे अंगरक्षक दोन बॅगा नेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. या व्हीडियोच्या कॅप्शनमध्ये लिहीताना त्यांनी “मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.”असा आरोप त्यांनी केला.