‘द बकिंघम मर्डर्स’ झळकणार
अभिनेत्री करिना कपूरचा चित्रपट
जाने जान आणि क्रू यासारख्या चित्रपटांमध्ये स्वत:चा दमदार अभिनय दाखवून देणारी अभिनेत्री करिना कपूर आता हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपट ‘द बकिंघम मर्डर्स’मुळे चर्चेत आहे. 67 व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर तो मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला होता.
आता द बकिंघम मर्डर्स चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात करिनाने नायिकेची भूमिका साकारण्यासोबत निर्माती म्हणूनही जबाबदारी उचलली आहे. करिना कपूरचा हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीचा धाटणीचा असणार आहे.
बालाजी मोशन पिक्चरने हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात करिना कपूरसोबत रणवीर बरार, कीथ एलन आणि ऐश टंडन यांच्यासमवेत अनेक कलाकार दिसून येणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर आणि करिना कपूरने केली आहे. असीम अरोरा, कश्यप कपूर, राघव राज कक्कड यांनी याची पटकथा लिहिली आहे.
Home महत्वाची बातमी ‘द बकिंघम मर्डर्स’ झळकणार
‘द बकिंघम मर्डर्स’ झळकणार
अभिनेत्री करिना कपूरचा चित्रपट जाने जान आणि क्रू यासारख्या चित्रपटांमध्ये स्वत:चा दमदार अभिनय दाखवून देणारी अभिनेत्री करिना कपूर आता हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपट ‘द बकिंघम मर्डर्स’मुळे चर्चेत आहे. 67 व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर तो मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला होता. आता द बकिंघम मर्डर्स चित्रपटाची […]