पश्चिम बंगालमध्ये मारहाणीचे सत्र सुरुच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य व्यक्तींना होणाऱ्या मारहाणीचे सत्र सुरुच आहे. त्या संदर्भातील आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. तृणमूल काँग्रेसचा जयंत सिंग नामक एक कार्यकर्ता एका व्यक्तीचे हातपाय बांधून त्याला काठीने बेदम मारहाण करताना या व्हिडीओत दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
जयंत सिंग हा अरियादहा सामुहिक मारहाण प्रकरणात आरोपी आहे. त्याला 4 जुलैला अटक करण्यात आली होती. त्याने आणि त्याच्या गुंडांनी संदीप पांजा नामक विद्यार्थी आणि त्याची आई यांना मारहाण केली होती. या मारहाणीचेही सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असून या चित्रणावरुनच त्याला ओळखण्यात आले होते. या प्रकरणात त्याच्यासह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
तालताला क्लबात मारहाण
नवा व्हिडीओ हा कामरहाती येथील तालताला नामक क्लबातील आहे. येथे जयंत सिंग अशाच प्रकारे एका युवकाला मारहाण करताना दिसत आहे. हे चित्रण 4 जुलैपूर्वीचे असल्याचे दिसून येते. जयंत सिंग हा तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांचा विश्वासू सहाय्यक असल्याचा आरोप केला जात आहे. नव्या व्हिडीओतील पिडित कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
अनेक प्रकरणे समोर
गेल्या तीन चार महिन्यांमधील अशी अनेक मारहाण प्रकरणे व्हिडीओ चित्रणासह समोर आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. या सर्व मारहाण प्रकरणांमध्ये तृणमूल काँग्रेसचेच कार्यकर्ते किंवा नेते असा कायदा हातात घेताना दिसून येतात. यावरुन राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची किती दुर्दशा झाली आहे, याचा प्रत्यय येतो. जो पक्ष आम्हाला नैतिकता शिकवतो, त्याची सत्ता असणाऱ्या राज्यात कशी परिस्थिती आहे हे आता साऱ्या देशाला समजले असून राज्य सरकारला याची किंमत भोगावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या सोशल मिडिया कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी केले.
Home महत्वाची बातमी पश्चिम बंगालमध्ये मारहाणीचे सत्र सुरुच
पश्चिम बंगालमध्ये मारहाणीचे सत्र सुरुच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य व्यक्तींना होणाऱ्या मारहाणीचे सत्र सुरुच आहे. त्या संदर्भातील आणखी एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. तृणमूल काँग्रेसचा जयंत सिंग नामक एक कार्यकर्ता एका व्यक्तीचे हातपाय बांधून त्याला काठीने बेदम मारहाण करताना या व्हिडीओत दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल शाखेचे अध्यक्ष सुकांत […]