छतरपूरमध्ये भीषण अपघात, ट्रकची टॅक्सीला धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. तसेच कादारीजवळ नॅशनल हायवे 39 महामार्गावर ट्रकने टॅक्सीला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वृद्ध आणि …

छतरपूरमध्ये भीषण अपघात, ट्रकची टॅक्सीला धडक, 5 जणांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला. तसेच कादारीजवळ नॅशनल हायवे 39 महामार्गावर ट्रकने टॅक्सीला धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 20 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसार टॅक्सी रेल्वे स्थानकावरून बागेश्वरकडे जात होती. अपघात झालेली टॅक्सी छतरपूर रेल्वे स्थानकाहून बागेश्वर धामकडे जात होती. पोलिसांना सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मध्यप्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील काडारीजवळ पहाटे हा अपघात झाला.

 

घटनास्थळी नागरिकांनी जखमींना छतरपूर रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतांची ओळख पटवली जात आहे. हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे तेथून जाणाऱ्या लोकांनी सांगितले. ट्रकची धडक बसल्याने टॅक्सीचा चक्काचूर झाला.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source